१. श्रीरामाचे पात्र साकारणार्या एका कलाकाराचा अभिनय पाहून भावजागृती होणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीरामरूपातील स्मरण होणे
‘एकदा मी श्रीरामाचे पात्र साकारणार्या एका कलाकाराच्या अभिनयासंबंधी ‘व्हिडिओ क्लिप’ पाहिली. त्या कलाकाराचा अभिनय पहातांना माझी भावजागृती होत होती. मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) श्रीरामरूपातील स्मरण झाले. ती अभिनयाची क्लिप पाहून झाल्यावर काही दिवस मला केवळ प्रभु श्रीरामाची आठवण येत होती आणि ‘माझ्या समवेत श्रीराम आहे’, असे मला जाणवत होते.
२. प्रभु श्रीरामावर आधारित सुचलेले गीत

नंतर मला पुढील गीत सुचले. या गीतातील संवाद सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि एक जीव (मनुष्य) यांच्यातील आहे. या गीतामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले एका जिवाला ‘ईश्वरप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण कसे करावे ?’, याचे दिशादर्शन करत आहेत.
श्रीराम ऽऽ जयराम ऽऽ
राजाराम ऽऽऽ श्रीराम ऽऽ ।
राम ही तो आस है, राम ही विश्वास है ।
राम नाम के जाप का ही तो, जीवन नौका का ध्यास है ।
श्रीराम ऽऽ जयराम ऽऽ राजाराम ऽऽऽ श्रीराम ऽऽ ।। १ ।।
(इस संपूर्ण विश्व मे ईश्वर का नाम ही हमे भवसागर पार करा सकता है । )
राम से आरंभ है, राम मे ही अन्त है ।
राम के कारण ही इस देह मे हर श्वास है ।
श्रीराम ऽऽ जयराम ऽऽ राजाराम ऽऽऽ श्रीराम ऽऽ ।। २ ।।
(प.पू. गुरुदेव समझा रहे है, ‘यह संसार माया है । तुम्हारी उत्पत्ती और लय सब कुछ मुझमे ही समाया है ।’)
राम के बिना मै एक पग भी ना चल सकू ।
राम साथ है ऽऽ तो हर ज्योतमें (टीप १) प्रकाश है ।
श्रीराम ऽऽ जयराम ऽऽ राजाराम ऽऽऽ श्रीराम ऽऽ ।। ३ ।।
(मनुष्य को ज्ञान होता है की, ‘ईश्वर की इच्छा के विरुद्ध पेड का एक पत्ता भी नही हिल सकता ।’)
राम ही आदर्श है, राम के लिए संघर्ष है ।
राम ही तो एकमात्र मोक्ष का ऽऽऽ धाम है ।
श्रीराम ऽऽ जयराम ऽऽ राजाराम ऽऽऽ श्रीराम ऽऽ ।। ४ ।।
(प.पू. गुरुदेव बता रहे है, ‘केवल श्रीराम ही एक ऐसे आदर्श एवं मर्यादा पुरुषोत्तम है, जिनकी आज संपूर्ण विश्व को आवश्यकता है ।’)
श्रीराम से ही सत्य है, श्रीराम में ही सत्य है (टीप २) ।
श्रीराम ही तो सत्य है (टीप ३), श्रीराम के हम भक्त है (टीप ४) ।
श्रीराम ऽऽ जयराम ऽऽ राजाराम ऽऽऽ श्रीराम ऽऽ ।। ५ ।।
(जलद गती मे) श्रीराम, श्रीराम, श्रीरा ऽऽऽ.. म ।
जयराम, जयराम, जयरा ऽऽऽ..म ।
राजाराम, राजाराम, राजारा ऽऽऽऽ..म ।
श्रीराम, श्रीराम, श्रीरा ऽऽऽऽ..म ।
श्रीराम ऽऽ जयराम ऽऽ राजाराम ऽऽऽ श्रीराम ऽऽ श्रीराम ऽऽ श्रीराम ऽऽ ।। ६ ।।
टीप १ – मनुष्य के हृदय मे जो ज्ञान, श्रद्धा तथा भक्ती की ज्योत होती है, उसे केवल ईश्वर ही जगा सकते है ।
टीप २ – जहां राम (ईश्वर) है, वही सत्य है ।
टीप ३ – विश्व मे श्रीराम (ईश्वर) ही एक मात्र सत्य है ।
टीप ४ – हनुमानजी यह कह रहे है ।
३. गीतासंदर्भात आलेल्या अनुभूती
अ. हे गीत लिहितांना माझी भावजागृती होत होती.
आ. मला स्थिरता, आनंद आणि शांती यांची अनुभूती आली.
इ. मला हे गीत हिंदी भाषेत चालीसहित सुचले.’
– कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.१०.२०२४)
संगीताला साधनेची जोड देण्याचे महत्त्व !

‘साधिकेला गीत सुचण्यासह त्याची चालही सुचणे हे दैवी आहे. साधिका संगीताच्या (नृत्याच्या) माध्यमातून साधनारत आहे. तिच्या श्रीरामाप्रतीच्या भावामुळे तिला ‘दैवी गीत चालीसहित सुचणे’, ही अनुभूती घेता आली. संगीतातील दैवी अनुभूती घेण्यासाठी आणि संगीतातील सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी संगीताला साधनेची जोड देणे आवश्यक आहे.’
– सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), बी.ए. संगीत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.३.२०२५)
|