
‘ईश्वराने आपली प्रार्थना ऐकावी आणि त्याप्रमाणे फळ द्यावे’, असे खरोखरच वाटत असेल, तर ज्या फळाची आपणास अपेक्षा आहे, त्याच्या प्राप्तीच्या दृष्टीने स्वतःची असेल ती शक्ती पणाला लावून प्रामाणिकपणे कार्य करत रहाणे अत्यंत आवश्यक आहे. ‘असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी’, या भावनेने देवाजवळ केवळ मागणे मागून स्वस्थ बसून रहाणे खुळेपणाचे आहे. ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असणार्या, परमात्म्याच्या सर्वज्ञतेवर आणि सर्व समर्थतेवर दृढ विश्वास असणार्या धर्मशास्त्रानेही गबाळ्या निष्क्रीयतेला वा वेडगळ आलस्याला कुठेही प्रोत्साहन दिले नाही.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ‘संघ प्रार्थना’ ग्रंथातून)