मनुष्याच्या देहातील सप्तचक्रे आणि त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये यांच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नांची सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेली ज्ञानमय उत्तरे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३.४.२०२५ या दिवशीच्या लेखात आपण मृत्यूनंतर स्थूलदेह तेथेच रहातो आणि लिंगदेह मनोदेह, कारणदेह, महाकारणदेह अन् आत्मा यांसह बाहेर पडतो. प्राणदेहातील काही शक्ती शरिरातून उत्सर्जित होते, तर काही शक्ती त्या लिंगदेहाच्या पुढील प्रवासासाठी वापरली जाते. मनुष्याच्या स्थूलदेह, प्राणदेह, मनोदेह, कारणदेह, महाकारणदेह आणि आत्मा यांपैकी कोणत्या देहात सप्तचक्रे आणि त्याच्याशी संबंधित इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाड्या असतात, हा भाग पाहिला. आज आपण या लेखमालेचा उर्वरित भाग पाहूया.                      

(भाग ५)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/898743.html

सुश्री (कु.) मधुरा भोसले

३ आ. व्यक्तीच्या देहातील सप्तचक्रांची भौतिक आणि आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये 

टीप १ आणि संदर्भ : सप्तचक्रांशी संबंधित असणारी चित्तातील प्रधान केंद्रे

टीप २ : गद्यपद्य सुचणे आणि आरोग्याची प्राप्ती होणे; हाच मनुष्यदेहाचा मूळ आधार आहे. हेच कुंडलिनी-शक्तीचे निवासस्थान आहे. अंतरंगी (अंतःकरणात वास करणारी) मूळ चित्तशक्तीही विराजमान आहे. योगाद्वारे मूलाधारातील कुंडलिनी-शक्ती आणि चित्तशक्ती यांची जागृती केली जाते. याच परम शक्तीला जागृत करून तिच्यावर नियंत्रण मिळवणे, हेच योगसाधनेचे प्रमुख लक्ष्य असणे

टीप ३ : भक्ती, आरोग्य आणि प्रभुत्व यांची सिद्धी प्राप्त होणे

टीप ४ :  आरोग्य, ऐश्वर्य, जगाचे पालन आणि विनाश करण्याची अपूर्व शक्ती प्राप्त होणे

टीप ५ : अणू आदी अष्टमहासिद्धी प्राप्ती होणे

टीप ६ : जन्म आणि मृत्यू पाशांच्या पिडेतून मुक्त होणे

टीप ७ आणि ८ : कमळाच्या कर्णिकेमध्ये म्हणजे मध्यभागी महाशून्यात एक शक्तीमंडल असते. त्यामध्ये एक दिव्य तेजबिंदू असतो. त्याचे तेज सहस्रो सूर्यांहून अधिक असते. यातूनच ज्ञानाचा लाभ होतो. तो अज्ञानाचा नाश करणारा सूर्यस्वरूप परमात्मा आहे. साधनेद्वारे या प्रकाशाचे दर्शन करण्याला ‘साक्षात्कार’ या नावाने संबोधले जाते. तो देहाचा मूळ आधार आहे आणि हेच कुंडलिनी शक्तीचे  निवासस्थान आहे.

४. अनुभूती 

या धारिकेतील प्रश्न वाचतांनाच त्यांचे उत्तर मनाच्या अंतःपटलावर लीलया उमटत होते आणि त्याचे लिखाणही सहजरित्या होत होते. संपूर्ण धारिकेचे टंकलेखन करत असतांना चंदनाचा दैवी मंद सुगंध माझ्या अवतीभोवती दरवळत होता आणि मला हृदयाच्या ठिकाणी गारवा जाणवून शांत वाटत होते. श्रीगुरुकृपेने मला ही अनुभूती आली, यासाठी मी श्रीगुरुचरणी लक्ष लक्ष वेळा कृतज्ञ आहेत.

५. कृतज्ञता 

श्रीगुरुकृपेमुळे सप्तचक्रे आणि कुंडलिनी नाड्या यांच्या संदर्भातील वरील ज्ञान मिळाले. त्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्त्व मला उमजले यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.’

(समाप्त)

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक