‘मागील ३० वर्षांपासून मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे; मात्र विरोध करणारे आणि वाईट शक्तींचा त्रास असलेले लोक माझ्यावर टीका करून ‘मला परात्पर गुरु डॉक्टरांनी संमोहित केले आहे’, असा बिनबुडाचा आरोप करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्याकडून ‘गुरुकृपायोग’ या त्यांनी निर्मिलेेल्या साधना मार्गानुसार साधना करवून घेत आहेत. आध्यात्मिक प्रगती करून जीवन आनंदी करत आहेत. मी त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण करतो.
परम पूज्य (टीप १) होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैद्य (डॉक्टर)।
संशोधन करूनी शोभले ‘संमोहन उपचार तज्ञ’ ॥ १ ॥
लोक मजवरी टीका करती निरंतर ।
म्हणती संमोहित झाले आहेत ‘वटकर’ (टीप २) ॥ २ ॥
मी झालो देव-धर्मासाठी वेडा ।
पार केला गुरूंनी जन्म-मरणाचा फेरा ॥ ३ ॥
पू. शिवाजी वटकर
मज लागले नाम नि सत्संग यांचे व्यसन ।
साधनेतून मिळते मजला चैतन्याचे धन ॥ ४ ॥
तहान लागली मजला गुरूंच्या प्रीतीची ।
गुरुकृपेने भूक लागली सेवा अन् साधनेची ॥ ५ ॥
आता नाही काळजी मायेची नि टीकेची ।
पाठीराखा सखा माझा गुरु असे सूत्रधार ॥ ६ ॥
टीप २ – श्री. शिवाजी वटकर यांच्यासारखे सनातनचे साधक
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक