सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनात ‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे’, हा विचार नित्य असणे

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्री. अरविंद ठक्कर

श्री. अरविंद ठक्कर (वय ६४ वर्षे) : गुरुदेव, आपल्याला सर्व साधकांची चिंता असते. ही आपली अपार प्रीतीच आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नाही. मला कुणाचीच चिंता नसते; कारण चिंता ही मानसिक स्तरावरची असते. मी आध्यात्मिक स्तरावर विचार करतो. ‘साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे’, हाच माझ्या मनात विचार असतो.