|
लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) – येथे हिंदु व्यक्ती तिच्या मोटारसायकलचा शेवटचा हप्ता जमा करू शकली नाही, तेव्हा अर्थपुरवठा करणार्याचा हस्तक (एजंट) फहीम खान याने या हिंदूला त्याच्या मुलीचे लग्न त्याच्याशी करून देण्याची मागणी केली. या प्रकरणी हिंदु व्यक्तीने पोलिसांत तक्रार केली आहे.
सेमरी गावात रहाणारे श्रीपाल यांनी वर्ष २०२२ मध्ये ‘हिरो फायनान्स लिमिटेड’कडून हिरो आस्थापनाची मोटारसायकल घेण्यासाठी कर्ज घेतले होते. श्रीपाल यांनी या पैशाचे २३ हप्ते जमा केले होते. काही कारणास्तव ते शेवटचा हप्ता जमा करू शकले नाहीत. त्यानंतर श्रीपाल यांना अर्थपुरवठा करणार्या आस्थापनाचा हस्तक फहिम खान याचा दूरभाष आला. त्याने श्रीपालला हप्ता न भरल्यावरून शिवीगाळ करत वरील प्रकारची मागणी केली.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमानांची हिंदुद्वेषी मानसिकता नष्ट करण्यासाठी चीन ज्याप्रमाणे त्यांना सुधारगृहात डांबून ठेवतो, तसा प्रयत्न करण्याची कुणी या घटनेवरून मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |