Manoj Muntashir On Aurangzeb Tomb : औरंगजेबाचे थडगे न हटवता त्याच्यावर शौचालय बांधा !

प्रसिद्ध लेखक आणि गीतकार मनोज मुंतशिर यांची भारत सरकारकडे मागणी !

औरंगजेबाचे थडगे (डावीकडे) लेखक आणि गीतकार मनोज मुंतशिर (उजवीकडे)

मुंबई – महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेले औरंगजेबाचे थडगे हटवण्याची मागणी करण्यात येत आहे; पण मी या मागणीच्या विरोधात आहे. औरंगजेबाचे थडगे हटवू नये, तर त्याच्यावर शौचालय बांधा, अशी मी भारत सरकारला विनंती करतो. आम्ही सनातनी त्याला युरिया आणि मीठ दान करू, असे विधान लेखक आणि गीतकार मनोज मुंतशिर यांनी केले आहे.

मुंतशिर म्हणाले,

‘‘जेव्हा आम्ही हिंदु श्रीरामजन्मभूमीची लढाई सर्वोच्च न्यायालयात लढत होतो, तेव्हा या ‘शांतीप्रिय’ समाजातील काही लोक आम्हाला म्हणत होते की, देव सगळीकडेच आहे. त्यामुळे श्रीराममंदिर बांधण्याची काय आवश्यकता आहे ? या भूमीवर रुग्णालय, शाळा किंवा अनाथ आश्रम बांधा.’’