Ladki Bahin Yojana Fraud : सहस्रो बोगस अर्जांद्वारे २ परप्रांतीय मुसलमान महिलांकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचा अपलाभ !

पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

पुणे – लातूर आणि सांगली जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून परराज्यात रहाणार्‍या मुनमुन ठाकरे आणि अनवरा बेगम या २ महिलांनी बनावट ओळखपत्राद्वारे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे १ सहस्र १७१ अर्ज भरले; मात्र अन्वेषणात या अर्जदार महिला उत्तरप्रदेश, आसाम, बंगाल आणि राजस्थान येथील असल्याचे उघड झाले आहे. तसेच त्या अंगणवाडी सेविका नसल्याचेही समजले. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. त्यांना अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मुनमुन ठाकरे हिने तिचा पत्ता सांगली जिल्ह्यातील हजारवाडी येथील दाखवला होता, तर अनवरा बेगम हिने तिचा पत्ता लातूर जिल्ह्यातील बोरगाव येथील दाखवला होता.

एकट्या बार्शी तालुक्यात २२ बोगस अर्ज आले होते. त्यांना मिळणारे पैसे आता तातडीने थांबवण्यात आले आहेत. बार्शी तालुक्यातील एका गावात मुसलमान महिलांचे अर्ज सापडले. प्रत्यक्ष गावात एकही मुसलमान कुटुंब नाही. अधिकार्‍यांकडून आधारकार्ड क्रमांक, बँक खात्याच्या आधारे पडताळणी करण्यात आली.

संपादकीय भूमिका

सहस्रो अर्ज बोगस असल्याचे प्रशासनाला समजले कसे नाही ? अर्जांची छाननी डोळे मिटून केली कि काय ? अशा कर्तव्यचुकार कर्मचार्‍यांनाही शिक्षा करणे आवश्यक !