वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमान तरुणाकडून हिंदु संघटनेच्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग केल्याचे प्रकरण
वाराणसी – वाराणसी जिल्ह्यातील आंबिया मंडीमध्ये एका मुसलमान तरुणाने एका हिंदु संघटनेच्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली. मुसलमान तरुणाने मुलीची छेड काढताच तिने आरडाओरड केली. मुलीचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य घटनास्थळी पोचले. ते आरोपी तरुणाला पोलीस ठाण्यात नेण्याची सिद्धता करत असतांना आरोपी तरुणाच्या बाजूचे १०० मुसलमान तरुण तेथे आले आणि त्यांनी हिंदूंवर प्राणघातक आक्रमण करून आरोपीला सोडवले. आरोपी तरुणाला मुसलमानांच्या गटाने नेल्यानंतर अंबिया मंडी (कोतवाली) परिसरात तणाव निर्माण झाला.
१. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुड्डू, रिझवान आणि इतर अज्ञात आरोपी यांच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण इत्यादी कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
२. दुसरीकडे मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात घायाळ झालेल्या राहुल प्रजापती यांच्या तक्रारीवरून बिलाल, सलीम, रिजवान यांच्यासह १०० अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येचा प्रयत्न, आक्रमण, दंगल आणि धमकी या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३. या प्रकरणी पोलिसांनी रात्री अंबिया मंडी परिसरातील एजाज अहमद, गुलजार, हाशिम, महंमद यांना अटक केली. मुख्य आरोपी आणि इतरांचा शोध चालू आहे, असे पोलीस उपायुक्त गौरव बन्सल यांनी सांगितले. या घटनेनंतर अंबिया मंडी परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.
संपादकीय भूमिका
|