रत्नागिरीत क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदु तरुणांना मारहाण

प्रतिकात्मक छायाचित्र

रत्नागिरी – तालुक्यातील मिरकरवाडा जेटी परिसरात १ एप्रिलला दुपारी अर्जुन चव्हाण (वय १८ वर्षे) या हिंदु तरुणाला प्लास्टिक पिशवी खरेदीच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांध विक्रेत्याने मारहाण केली. या वेळी अर्जुनने त्याच्या साहाय्यास त्याच्या भावाला बोलावले असता धर्मांध जमावाने त्याच्या भावासह साहाय्याला आलेल्या अन्य ३ हिंदूंनाही मारहाण केली आहे. घायाळ अर्जुनला जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या आहेत. ‘आमच्या गाडीवर हिंदू लिहिले आहे; म्हणून आम्हाला मारहाण करण्यात आली’, असा आरोपही घायाळ अर्जुन आणि त्याचा भाऊ करण यांनी केला आहे.

१.  १ एप्रिलच्या दुपारी मिरकरवाड्यात मासे आणायला गेलेल्या अर्जुन उमेश चव्हाण हा धर्मांध विक्रेत्याकडे पिशवी खरेदी करायला गेला होता. सुट्टे पैसे नसल्याने त्याने विक्रेत्या चाचाकडे ‘गूगल पे’साठी ‘स्कॅनर’ मागितला. त्या वेळी तो ‘स्कॅनर’ बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर अर्जुनने विक्रेत्याला तसे सांगितले. यावर धर्मांध विक्रेत्याने ‘अब मेरे मुंह पे छाप’, असे उर्मट उत्तर दिले.

२. यानंतर ‘मला तुमची पिशवी नको’, असे सांगून अर्जुन दुसर्‍या दुकानात जात होता. त्या वेळी धर्मांध विक्रेत्याने त्याला पुन्हा बोलावले आणि त्याला तो मारहाण करू लागला. या वेळी अर्जुनने त्याचा भाऊ करण याला बोलावले.

३. करण आणि त्याच्या समवेत दोघे-तिघेजण तिथे पोचले. त्या वेळी त्या विक्रेत्यांसमवेत अनेक धर्मांधांनी गर्दी केली. या जमावाने अर्जुनसह त्याचा भाऊ करण आणि त्यांच्या सहकार्‍यांना मारहाण केली.

४. घायाळ अर्जुनला रुग्णालयात भरती केल्याची बातमी सर्वत्र प्रसारित झाल्यानंतरअनेक  हिंदु संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा रुग्णालयात गेले.

५. शहर पोलिसांनी अर्जुनचा जबाब नोंदवला असून त्यात त्याने म्हटले आहे की, मिरकरवाड्यात आम्हाला सातत्याने त्रास दिला जात आहे. आमच्या गाडीवर ‘हिंदू’ लिहिल्यामुळे आम्हाला त्रास दिला जात आहे.

६. धर्मांधांकडूनही ‘आम्हालाच मारहाण करण्यात आली आहे’, अशी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

७. ‘घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील अन्वेषण केले जाईल’, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. नागरिकांना संयम राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन शहर पोलीस निरीक्षक शिवरकर यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

  • क्षुल्लक कारण काढून हिंदूंवर आक्रमण करण्याची धर्मांधांची खोड जुनी आहे. अशांना वठणीवर आणण्यासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीसह प्रभावी हिंदूसंघटन हीच काळाची आवश्यकता !
  • साध्या प्लास्टिक पिशवीच्या कारणावरून मारहाण करणारे मुसलमान हिंदूंशी कधी चांगले वागतील का ?
  • धर्मांधांकडे हिंदूंनी कोणत्याही वस्तूची खरेदी का करावी ? असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?