
१. महाकुंभपर्वाच्या कालावधीत भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न !
अ. ‘दिवसभरातील प्रत्येक कृती करतांना ‘मी सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी ती कृती करत आहे’ किंवा ‘महाकुंभच्या ठिकाणी सेवा करत आहे’, असा भाव ठेवत असे.
आ. प्रतिदिन स्नान करतांना ‘प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर गंगा नदीत स्नान करत आहे’, असा माझा भाव असायचा.
६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या शिरिन चाइना (वय ७३ वर्षे) यांना स्वतःत जाणवलेले पालट !
१. ‘अलीकडे मला चक्कर येण्याचा त्रास चालू झाला आहे; परंतु या स्थितीतही मला पुष्कळ आनंद जाणवत आहे.
२. बर्याचदा मी साधकांशी बोलतांना ‘मी साधकाशी / साधिकेशी बोलत आहे’, असे मला वाटत नाही. तेव्हा ‘एक साधक-जीव दुसर्या साधक-जिवाशी अध्यात्माविषयी संवाद साधत आहे’, असे मला जाणवते.’
– शिरिन चाइना (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२५)
२. महाकुंभपर्वाच्या कालावधीत आलेल्या अनुभूती !

२ अ. सुगंध येणे : बर्याचदा रात्रीच्या वेळी माझ्या उजव्या हाताला सुगंध यायचा, तसेच माझ्या कपड्यांना कुंकवाचा सुगंध यायचा. प्रत्यक्षात मला कुंकवाची ‘ॲलर्जी (असात्म्यता)’ असल्यामुळे मी कुंकू वापरत नाही.
२ आ. नामजप करत असतांना सूक्ष्मातून २ नामजप ऐकू येणे : एकदा मी नामजप करत पलंगावर पहुडले होते. तेव्हा मला एकाच वेळी दोन नामजप ऐकू येत होते. (प्रत्यक्षात वयोमानानुसार माझी ऐकण्याची क्षमता ७० टक्के न्यून झाली आहे.) माझ्या मणिपूरचक्राच्या ठिकाणी मला ‘महाशून्य’, हा जप ऐकू येत होता, तर माझ्या सहस्रारचक्राच्या स्थानातून सूक्ष्मातून कारंज्याप्रमाणे पाणी येत होते आणि ‘ॐ नमः शिवाय ।’, हा दुसरा नामजप ऐकू येत होता. तेव्हा मला जाणवले, ‘भगवान शिव हे ‘महाकुंभपर्वा’चे आराध्य दैवत आहे.’
२ इ. भावस्थिती अनुभवणे आणि मानसरित्या महाकुंभच्या ठिकाणी जाऊन सेवा करणे : प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या पूर्वी २ – ४ दिवसांपासून माझ्या मनात सतत महाकुंभाविषयीचे विचार असायचे. त्यामुळे मी प्रतिदिन साधारण २ ते ४ घंटे भावस्थितीत असायचे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मी ही भावस्थिती अनुभवत होते. मी भावस्थितीत असतांना प्रतिदिन न्यूनतम २ घंटे मानसरित्या सेवा करत असे. मी महाकुंभच्या ठिकाणी मानसरित्या जाऊन वृद्ध महिला नागा साधूंचे कपडे धुऊन देत असे. तेथे पुष्कळ थंडी असल्याने सहसाधकाच्या साहाय्याने मी त्यांच्यासाठी गरम जेवण नेऊन देत असे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या साहाय्याने मी त्यांना जाड कांबळे देत असे. ‘त्यांना आराम मिळावा’, यासाठी त्यांची अनुमती घेऊन मी त्यांच्या पायांना कोमट तेल लावून देत असे.
२ ई. १६.१.२०२५ या दिवशी ‘मी ज्या पलंगावर पहुडले होते, तो पलंग गंगा नदीवर तरंगत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा गंगामातेच्या आरतीच्या वेळी मी तिला (गंगामातेला) सूक्ष्मातून फूल आणि प्रज्वलित केलेला दिवा अर्पण करू शकले.
२ उ. ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादाने मी माझ्या खोलीत नसून प्रयागराज येथील कुंभमेळ्यातच आहे’, असे मला जाणवायचे.
२ ऊ. परात्पर गुरुदेवांना मानसरित्या अर्पण केलेले अन्नपदार्थ स्थुलातून आश्रमातील साधकांसाठी बनवलेले असणे : मी मानसरित्या परात्पर गुरुदेवांना सकाळचा अल्पाहार आणि दुपारचा महाप्रसाद यांसाठी जे पदार्थ अर्पण करत होते, प्रत्यक्षात तेच पदार्थ आश्रमात साधकांसाठी अल्पाहार किंवा महाप्रसाद यांसाठी बनवलेले असायचे. असे मी २-३ वेळा अनुभवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेयांच्यासारखेमोक्षगुरु मला लाभलेनसते, तर माझा हा जन्म वाया गेला असता. ‘केवळ त्यांनीच मला मायेच्या बंधनातून मुक्त करून श्रद्धेच्या मार्गावर आणले आहे’, याबद्दल मी त्यांच्या पावन चरणी कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होत आहे.’
– शिरिन चाइना (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२५)
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
साधकाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी ‘शस्त्रक्रिया कधी आरंभ झाली आणि कधी संपली’, हे स्वतःसाठी येता-जाता नामजप करत असतांना आपोआप कळणे अन् तेव्हा जागृत ध्यानावस्था अनुभवणे
मुंबईतील राजमातंगी यज्ञाला उपस्थित असणार्या सनातनच्या विज्ञापनदात्यांना आलेल्या अनुभूती !
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
प्रत्येक सेवा आणि कृती मनापासून अन् भावपूर्ण करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७७ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !