
ठाणे, २४ जानेवारी (वार्ता.) – उल्हासनगर येथील आशेळे गावातील महालक्ष्मी चाळ आणि कडू चाळ येथे अनधिकृतपणे भारतात वास्तव्यास असलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. रुमा बाबी उपाख्य सालया हाफीजूल खान आणि मुनीरुल माहिमुद्दीन सरदार अशी त्यांची नावे आहेत. सालया हाफीजूल खान हिला वास्तव्य करण्यासाठी साहाय्य करणार्या रफिक बिसबाय यालाही कह्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. अटक केलेले दोघेही बांगलादेशी नागरिक अनेक मासांपासून शहरात वास्तव्यास असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करण्याचे धाडस करत आहेत ! – संपादक)