२ हिंदूंची हत्या आणि एकाचे अपहरण

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबण्याऐवजी प्रतिदिन त्यात वाढच होत आहे. गेल्या ५ दिवसांत धर्मांध मुसलमानांनी ६ मंदिरांना लक्ष्य केले आहे. यांपैकी चितगावमधील हातझारी येथे ४, तर कॉक्सबाजार आणि लाल मोनिरहाट येथे प्रत्येकी एका मंदिरावर आक्रमण करण्यात आले. अन्य घटनांमध्ये २ हिंदूंची हत्या आणि एकाचे अपहरण झाले आहे. मृतांमध्ये निवृत्त महाविद्यालयीन शिक्षक दिलीप कुमार रॉय (वय ७१ वर्ष) यांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. जलखाठी जिल्ह्यात २६ वर्षीय व्यापारी सुदेव हलदर यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनांमधील एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.
6 Hindu temples have been attacked and looted in past 5 days in Bangladesh
2 Hindus have been killed and one abducted in this dastardly attack#Hindus and their temples are insecure in Bangladesh !#HindusarenotsafeinBangladesh pic.twitter.com/eprdIWdY5e
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 12, 2025
१. चितगावमध्ये मां विश्वेश्वरी काली मंदिरातील सोन्याचे दागिने आणि दानपेटी लुटण्यात आली. त्याचसमवेत सत्यनारायण सेवा आश्रम, मां मगधेश्वरी मंदिर आणि जगबंधू आश्रम येथेही चोरीच्या घटना घडल्या. कॉक्सबाजार येथील श्रीमंदिरातही चोरीच्या घटना घडल्या आहेत. येथे चोरट्यांनी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग नष्ट केले.
२. चितगाव येथील हिंदु सरपंच चंदन महाजन यांना त्यागपत्र देण्यास धर्मांधांनी भाग पाडले. त्याचवेळी गायबांडा जिल्ह्यात एका हिंदु महिलेच्या घराला आग लावण्यात आली. धलग्राम युनियनमध्ये २ हिंदूंच्या घरांवर दरोडा टाकल्याची घटना घडली.
बांगलादेश सरकार धर्मांध ! – बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषद
‘बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदे’चे कार्यवाहक सरचिटणीस मनिंद्र कुमार नाथ म्हणाले की, सध्याचे अंतरिम सरकार धर्मांध आहे. कोणतेही हिंसक कृत्य न करता आम्हाला हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात सरकारची उदासीनता आम्हाला नव्याने विचार करण्यास भाग पाडत आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील असुरक्षित हिंदू आणि त्यांची मंदिरे ! |
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले