Nasir Ali Khan Arrest : मंदिरात येऊन पूजा थांबवण्यासाठी पुजार्‍याला मारहाण करणारा काँग्रेसचा नेता नासिर अली खान याला अटक

जसपूर (छत्तीसगड) येथील घटना

अटक करण्यात आलेला काँग्रेसचा नेता नासिर अली खान पोलिसांसमवेत

जसपूर (छत्तीसगड) – हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेस पक्षाचा नेता नासिर अली खान याला अटक केली आहे. तो जसपूर काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष आहे.

३ जानेवारी २०२५ या दिवशी येथील श्री दुर्गादेवीच्या मंदिरात सकाळी ६ ते ७ या वेळेत पूजा होत असतांना नासिर अली तेथे पोचला आणि त्याने पूजा थांबवण्यास सांगितले. पुजारी भूपेंद्र पाठक यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता नासिर याने पुजार्‍याला शिवीगाळ करत मारहाण केली. मंदिरात उपस्थित भाविकांनीही नासिरला समजवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो भक्तांना शिवीगाळ करू लागला. त्याने भजन, कीर्तन आणि आरती यांसाठी लावण्यात येणारे भोंगेही बंद करण्यास सांगितले. यानंतर तो तेथून निघून गेला. या प्रकरणी पुजार्‍याने पोलिसांत तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी नासिर याला अटक केली.

संपादकीय भूमिका

  • ‘भारतात मुसलमान नाही, तर हिंदू मुसलमानांमुळे असुरक्षित झाले आहेत’, हे देशातील एकही राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी सांगत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेला’ या म्हणीनुसार ‘आधीच काँग्रेसवाला, त्यात धर्मांध’ असल्यामुळे हिंदूंच्या संदर्भात याहून वेगळे काय घडणार ?
  • काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना याविषयी काय म्हणायचे आहे ?