१. निराशा आल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातनच्या संतांचा चैतन्यमय सत्संग लाभणे
‘मागील ४ वर्षांचा कालावधी माझ्यासाठी वेदनादायी होता. माझी बाजू सत्याची असूनही जवळची माणसे विपरीत वागल्यामुळे मला निराशा आली होती. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातनच्या संतांच्या माध्यमातून मला सावरले. त्यांच्या कृपेने मला संतांच्या चैतन्यमय सत्संगाचा लाभ झाला, जसे सनातनच्या संतांचा प्रत्यक्ष सहवास लाभणे, काही संतांची भेट होणे, काही संतांचे दर्शन होणे, दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये संतांचे लिखाण, संतांविषयी लेख वाचायला मिळणे आणि प्रत्येक गुरुवारी भक्तीसत्संगातून चैतन्य मिळणे.
२. सनातनच्या संतांच्या सत्संगामुळे झालेले लाभ अ. संतांमुळेच माझे मन स्थिर राहू शकले.
आ. मला गुरुचरणी दृढभाव ठेवून प्रारब्ध सहन करण्याचे बळ मिळाले.
इ. गुरुकृपेने मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘देह प्रारब्धावर सोडा, चित्त चैतन्यासी जोडा’ या वचनाची वारंवार आठवण झाली.
ई. ‘तुम्ही संत मायबाप कृपावंत ।’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची यथार्थता मी अनुभवत आहे .
‘जगत्पालक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, मला सर्वत्र तुमचे चरण दिसून सर्व साधकांना साधनेसाठी बळ मिळो’, अशी मी तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना करतो.’
– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, फोंडा, गोवा. (२२.११.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |