ठाणे – बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून भिवंडीमध्ये वास्तव्य करणार्या ६ बांगलादेशी महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याविरोधात पारपत्र अधिनियम, परकीय नागरिकांचा कायदा कलमांतर्गत भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलांकडे पारपत्र आढळलेले नाही. त्यांनी बेकायदेशीरपणे भारतात आल्याचे मान्य केले.
संपादकीय भूमिकाअशा घुसखोरांना पुन्हा बांगलादेशातच हाकलून लावायला हवे ! |