कर्नाटक विधानसभेत लावण्‍यात आलेले स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र हटवले जाणार नाही ! – यू.टी. खादर, विधानसभा अध्‍यक्ष

विधानसभा अध्‍यक्ष, यू.टी. खादर

बेळगाव – कर्नाटक विधानसभेत लावलेले स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र हटवले जाणार नाही, असे आश्‍वासन कर्नाटक विधानसभेचे अध्‍यक्ष यू.टी. खादर यांनी दिले. ‘एखादी गोष्‍ट (सावरकरांचे छायाचित्र) काढणे योग्‍य नाही. त्‍यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. त्‍याऐवजी लोकांना एकत्र आणणे आणि समाजात सौहार्दपूर्ण वातावरण सुनिश्‍चित करणे यांसारख्‍या गोष्‍टी हाती घेतल्‍या पाहिजेत’, असे खादर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.