‘बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. केंद्र सरकारनेही जागतिक मत सिद्ध करून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत. त्याच वेळी यासाठी प्रभावी जागतिक संघटनांचे साहाय्य घेतले पाहिजे. या संकटकाळात भारत, जागतिक समुदाय आणि संस्था यांनी बांगलादेशातील पीडितांसमवेत उभे राहिले पाहिजे. जागतिक शांतता आणि बंधूभाव यांसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी बांगलादेशातील स्थितीविषयी व्यक्त केली आहे. बांगलादेशातील शांततापूर्ण निदर्शनांमध्ये हिंदूंचे नेतृत्व करणारे ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांना कारागृहात पाठवणे अन्यायकारक असून त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणीही होसबाळे यांनी केली.’ (२.१२.२०२४)