रामनाथी आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय 

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. सिद्धेश पोवार (सचिव, हरिहरेश्‍वर मंदिर), रायगड, महाराष्‍ट्र.

अ. ‘आश्रम पाहून माझे मन प्रसन्‍न झाले.

आ. मला सेवा आणि साधना करायला निश्‍चितच आवडेल.

इ. मी एका मंदिराचा विश्‍वस्‍त असल्‍याने ‘प्रत्‍येक मंदिरात असे आश्रम असावेत’, असे मला आवर्जून वाटते.’

२. श्री. महंतेश नाईक (हालसिद्धनाथ, बाळूमामा सेवेकरी संस्‍था), कोल्‍हापूर, महाराष्‍ट्र.

अ. ‘आश्रम पाहून मला वाटले, ‘मीही साधना करायला हवी.’

३. श्री. सोमनाथ भरमगुंडे (अध्‍यक्ष, ‘आम्‍ही भारताचे लोक’), सिद्धेेश्‍वर कुरोली, जिल्‍हा सातारा, महाराष्‍ट्र. 

अ. ‘आश्रम हेे माझे घर आहे’, असे मला वाटले.’

४. श्री. किशोर पटवर्धन (विश्‍वस्‍त, श्री काशी विश्‍वेश्‍वर देव ट्रस्‍ट), मिरज, महाराष्‍ट्र. 

अ. ‘आश्रमातील अत्‍यंत आदरशील सेवकांमुळे आणि येथील आध्‍यात्मिक स्‍पंदनांमुळे येथे दिव्‍यत्‍वाची अनुभूती येते.’

आ. ‘साधकांची फळी (‘टीम’) आपण उभारली आहे’, हे मला कौतुकास्‍पद वाटले.’  (सर्व सूत्रांचा दिनांक : २९.६.२०२४)