प्रभु श्रीरामांनी आपल्या पित्याच्या वचनासाठी वरवर; परंतु राक्षसांचा क्षय करण्यासाठी मुख्यतः राज्य सोडून वनवास स्वीकारला. तेव्हा त्यांचे ते कृत्य महान होते. जेव्हा श्रीरामचंद्रांनी लंकेवर चाल केली आणि अपरिहार्य धर्मयुद्धाला सज्ज होऊन रावणाला ठार मारले, तेव्हा त्यांचे ते कृत्य महत्तम होते.
(साभार : ‘लंडनची बातमीपत्र-४४’, ‘विजयादशमीचा उत्सव, २६ सप्टेंबर १९०९’)