चामराजनगर (कर्नाटक) – केरळच्या सीमेवर असलेल्या कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यातील गुंड्लूपेटे येथे एका ट्रकमध्ये गायींचे अवशेष आणून टाकल्याची घटना घडली. पावसामुळे ट्रकचे चाक चिखलात अडकल्याने चालक ट्रक सोडून पळून गेला. केरळहून खराब फळे आणि बांधकाम यांचा कचरा ट्रकमधून आणून तो फेकणार्या ट्रकचालकांनी आता मृत गायी आणून त्या टाकणे चालू केले आहे. केरळमध्ये रस्त्याच्या कडेला कचरा फेकल्यास ५० सहस्र रुपये दंड असल्याने केरळचा कचरा कर्नाटकात फेकला जात आहे.