रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. आकाश कदम यांचा आज आश्विन शुक्ल षष्ठी (९.१०.२०२४) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्री. आकाश कदम यांना २३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. परिपूर्ण सेवेची तळमळ
आकाशदादा कुठलीही सेवा परिपूर्ण करतो. सेवेत काही त्रुटी राहिल्यास त्या मनापासून स्वीकारून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. एकदा तो एका लग्न समारंभाच्या सिद्धतेची सेवा करत होता. तेव्हा तेथे येणार्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये, असा तो प्रयत्न करत होता.
२. स्थिरता आणि गुरूंप्रती शरणागतभाव असणे
एकदा दादाच्या हाताला दुखापत झाल्याने त्याचे शस्त्रकर्म करायचे होते. त्या वेळी दादा स्थिर आणि अनुसंधानात होता. त्यामुळे त्याची जखम मोठी असूनही त्याला वेदना अल्प होत होत्या. तेव्हा मला त्याच्यातील ‘स्थिरता आणि गुरूंप्रती शरणागतभाव असणे’, हे गुण मला शिकायला मिळाले.
– श्री. राजेश दोंतूल, सोलापूर (१०.७.२०२२)