मी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी गेलो होतो. त्या वेळी शेतात सेवा करतांना माझा नामजप आपोआप चालू झाला आणि भावजागृती होऊन पुढील शब्द मनःपटलावर उमटले. ते श्री गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो.
घोर कलियुगात ‘हिंदु राष्ट्र’ अवतरण्या गुरुदेवांनी (टीप १) संकल्प केला ।
या संकल्प पूर्तीसाठी मातेने श्रीसत्शक्तिरूपे (टीप २)
अवतार धारण केला ।। १ ।।
भक्तीसत्संगाच्या माध्यमातून तिने चैतन्याची उधळण केली ।
या सत्संगाने वसुंधरेवर जणू सत् विचारांची पखरण झाली ।। २ ।।
सत्विचार आणि सत्कृती यांची कास धरण्या ती मार्गदर्शन करते ।
साधकच नव्हे, तर समाज घडवण्या ती प्रत्येक मनाचा ठाव घेते ।। ३ ।।
गुरुदेवांचा संकल्प कार्यप्रवण करण्या रात्रंदिवस ती झटते ।
रज-तम नष्ट करोनी सतची निर्मिती
करण्या ती ‘स्व’चे देहभान विसरते ।। ४ ।।
यशोदेप्रमाणे कधी मऊ लोणी,
तर कधी कठोर होऊन सारे जन सांभाळते ।
गुरुदेवांचे कार्य एक-एक पाऊल सदासर्वदा पुढे-पुढे घेऊन ती जाते ।। ५ ।।
तूच भवानी, तूच दुर्गा, तूच नवचंडी या विश्वाची तू श्रीसत्शक्ति ।
रज-तम वृत्तींचा बीमोड करण्या जणू
तू अवतार धारण केला अवनीवरी ।। ६ ।।
आम्हा पामर साधकरूपी मुलांवर आई तुझा सदैव आशीर्वाद असावा ।
सत्स्वरूपी करून आमचा हा जीव श्री गुरुचरणी सत्वर अर्पण करावा ।।
केवळ हीच प्रार्थना या शुभदिनी तव चरणा, तव चरणा ।। ७ ।।
टीप १ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
टीप २ : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०२४)