आदिमाया जगदंबा तू ।
आदिमाया जगदंबा तू ।। धृ. ।।
विश्वजननी, विश्वमोहिनी ।
विश्वरक्षा विश्वसंहारिणी ।।
महिषासुरमर्दिनी, शुंभनिशुंभ हननी ।
भवसागरतारिणी यशदायिनी तू ।। १ ।।
उभी असशी सह्याद्री भुवनी ।
अचला तू नित्य समरांगणी ।।
दयानिधी तू शरणागतासी ।
खलप्रवृत्तीची संहारक तू ।। २ ।।
रूप तुझे ते नित्य स्मरो मी ।
चरण सदा शिरी धरो मी ।।
आस तव चरणांची मजला ।
ध्यास तव कृपेचा मजला ।। ३ ।।
देह अहंकार सोडण्या ।
अन् षड्रिपू निर्मूलना ।।
देऊनी आत्मबल मजला ।
करी धन्य या जीवना तू ।। ४ ।।
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२३)