
न्यूयॉर्क (अमेरिका) – बांगलादेशात हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार पूर्ण थांबलेला नाही. तेथे अद्यापही हिंदु, बौद्ध यांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात आहे. अशा परिस्थितीत अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस अमेरिका दौर्यावर आले आहेत. युनूस न्यूयॉर्क येथे पोचले असता ते रहात असलेल्या हॉटेलबाहेर बांगलादेशी नागरिक जमले आणि त्यांनी अल्पसंख्यांकांवर होणार्या आक्रमणांवरून युसून यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
🎯In New York, Bangladeshi nationals protest against Head of Bangladesh’s Interim government, Mohammad Yunus
“Power gained through dirty politics” – Protestors
👉 Why aren’t Indian-origin #Hindus protesting in #America?#HindusInBangladesh #NewYorkpic.twitter.com/wSsdAluLLi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 24, 2024
गलिच्छ राजकारण करून सत्ता मिळवली ! – आंदोलक
येथे आंदोलन करणारे शेख जमाल हुसेन म्हणाले की, डॉ. महंमद युनूस यांनी घटनाबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने सत्ता हातात घेतली आहे. त्यांनी गलिच्छ राजकारण करून सत्ता मिळवली. बांगलादेशात गेल्या काही मासांत बरेच लोक मारले गेले. आतापर्यंत निवडून आलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यागपत्र दिलेले नाही. आम्ही संयुक्त राष्ट्रांना नम्रपणे विनंती करतो की, त्यांनी बांगलादेशी लोकांचे येथे प्रतिनिधित्व करू नये.’
दुसरे आंदोलक डी.एम्. रोनाल्ड म्हणाले की, आमचा धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर विश्वास आहे. सत्तेवर आल्यानंतर युनूस यांनी हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती यांना मारणे चालू केले. बांगलादेशात आमचे लोक सुरक्षित नाहीत.
संपादकीय भूमिकाअमेरिकेतील भारतीय वंशाचे हिंदू असा विरोध का करत नाहीत ? |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan