Jhansi Rani Statue At Shahi Idgah Park : शाही इदगाह पार्कमध्ये झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्याच्या विरोधातील याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने शहरातील सदर बाजार परिसरात असलेल्या शाही इदगाह पार्कमध्ये झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्याच्या विरोधात ‘शाही ईदगाह व्यवस्थापन समिती’ने प्रविष्ट (दाखल) केलेली याचिका फेटाळली. या याचिकेमध्ये शाही ईदगाहवर अतिक्रमण न करण्याचे निर्देश देण्यात यावेत; कारण ही वक्फ मालमत्ता असल्याचा दावा करण्यात आला होता.

याचिका फेटाळतांना न्यायमूर्ती धर्मेश शर्मा यांनी म्हटले की, इदगाहच्या सीमेतील क्षेत्र, जे पार्क किंवा मोकळे मैदान आहे, ते देहली विकास प्राधिकरणाच्या (‘डीडीए’च्या) मालकीचे आहे. देहली वक्फ बोर्डदेखील धार्मिक कार्यांव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी उद्यानाचा वापर करण्याचा आदेश देत नाही. प्राधिकरणाला योग्य वाटेल तशी भूमी सार्वजनिक वापरासाठी देऊ शकते. याचिकाकर्त्या समितीचा कोणता धार्मिक अधिकार कसा धोक्यात येऊ शकतो ?, हे समजत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्यास विरोध करणारे देशद्रोहीच होत ! अशांवर कारवाई करण्याचाही कायदा असायला हवा !