‘सप्टेंबर २०२३ मध्ये पितृपक्ष आरंभ झाल्यावर मला वडापाव, समोसा, पाणीपुरी इत्यादी बाहेरचे पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होत होती. १५.१०.२०२३ या दिवसापासून नवरात्र आरंभ झाल्यावर मला अकस्मात् फळे खाण्याची तीव्र इच्छा झाली. नवरात्रीत २ – ३ दिवस फळे खाऊन झाल्यावर मला हा पालट प्रकर्षाने जाणवला. तेव्हा वातावरणावर पितरांचा, तसेच ‘पितृपक्षानंतर लगेच देवीतत्त्वाचा झालेला परिणाम जीवसृष्टीवर कसा परिणाम करतो ?’, याची प्रचीती आली. पितृपक्षात अतृप्त लिंगदेह विविध जिवांच्या माध्यमातून इच्छा पूर्ण करतात. त्यानुसार मला रज-तम युक्त पदार्थ खाण्याची आणि नवरात्रीत सात्त्विक फळे खाण्याची इच्छा होणे, हे मला अनुभवायला दिले, त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, गोवा. (१६.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |