राज्यातील ४५० ‘आयटीआय’मध्ये स्वरक्षण प्रशिक्षण चालू करणार !

मुंबई, ३ सप्टेंबर (वार्ता.) – येत्या ५ दिवसांत राज्यातील ४५० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण चालू करणार आहोत. यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या संपर्कात आम्ही आहोत. ५ संस्थांनी आमच्याशी संपर्क केला आहे. प्रशिक्षण देणार्‍या संस्थांसमवेत आम्ही करार करणार आहोत, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.