सांगली येथे हिंदु तरुणीवर धर्मांतर अन् विवाह यांसाठी दबाव टाकणार्‍या २ धर्मांधांना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली, ३० ऑगस्ट (वार्ता.) – धर्मांतर करून विवाह करण्यासाठी हिंदु तरुणीवर दबाव टाकल्याप्रकरणी वडील आयुब पटेल आणि मुलगा अफताब आयुब पटेल (रा. साई कॉलनी, शिंदे मळा, पंचशीलनगर, सांगली) यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे, तसेच आफताब याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.

शहरातील एका उपनगरातील तरुणीशी अफताब पटेल याने वेळोवेळी भ्रमणभाष आणि सामाजिक माध्यम यांद्वारे संपर्क साधून मैत्री केली. डिसेंबर २०२२ पासून हा प्रकार चालू होता. त्यानंतर त्याने तरुणीला ‘मैत्री कर, धर्मांतर करून विवाह कर’, असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, तसेच तिचा पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला. अफताबचे वडील आयुब यांनी तिला नोकरी आणि मानसिक आधार देण्याच्या बहाण्याने मुलाशी विवाह करण्यासाठी दमदाटी केली. पीडितेने त्यांच्या मनाप्रमाणे न केल्यास तिच्या घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर पीडित तरुणीने हा प्रकार घरातील लोकांना सांगितला. त्यानंतर तिने सांगली शहर पोलीस ठाण्यात धर्मांधांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धर्मांध आयुब पटेल आणि अफताब पटेल या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील या अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

  • हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा पुन्हा होत आहे; अशांना कठोर शिक्षा का होत नाही !
  • कायद्याचा धाक नसणार्‍या धर्मांधांची मानसिकता जाणा !
  • स्वत:ला अल्पसंख्य म्हणवणार्‍या आणि बहुसंख्यांकांच्या जिवावर उठलेल्यांचा हा उद्दामपणा नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करून हिंदूंचा वंशविच्छेद करत असलेल्या धर्मांधांवर वचक बसवण्यासाठी हिंदूंचे प्रखर संघटन हवे !