उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी तोडले अकलेचे तारे !
पुणे – जयदीप आपटे हा ‘सनातन प्रभात’शी कसा संबंधित आहे ?, हे त्याच्या मुलाखतीवरून स्पष्ट झाले आहे, असे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी येथे केले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ४ डिसेंबर २०२३ या दिवशी भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने मालवण येथील राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. या निमित्ताने सनातन प्रभातच्या पत्रकाराने जयदीप आपटे यांची भेट घेऊन त्यांची मुलाखत प्रसिद्ध केली होती. हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ या दिवशी कोसळला. त्यानंतर या मुलाखतीचा संदर्भ घेऊन अंधारे यांनी सनातन प्रभातवर अश्लाघ्य टीका केली.
१. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, जो माणूस दीड फुटापेक्षा अधिक उंचीचे पुतळे उभारू शकत नाही, अशा माणसाला एवढे मोठे काम का दिले गेले ? नितेश राणे आणि जयदीप आपटे यांची मैत्री असल्यामुळेच सिंधुदुर्गतील मालवणमध्ये पुतळा उभारण्याचे दायित्व त्यांच्यावर दिली गेले का ? हे नाते काय सांगते ?
२. २८ ऑगस्ट या दिवशी ‘मालवण बंद’च्या आंदोलनात महाविकास आघाडी आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यात शाब्द़िक चकमक उडाली आणि त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
(म्हणे) ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलेल्या उत्तरावरून आपटे याचा काही छुपा ‘अजेंडा’ होता का ?’
‘सनातन प्रभात’ला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांचे जात्यंध वक्तव्य !
मुंबई – कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने छत्रपती शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याने वार केला होता. त्यामध्ये महाराजांना इजा झाली होती. या जखमेची खूण असलेला पुतळा बनवून आपटेला काय सांगायचे होते ? या संदर्भात त्याने ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलेल्या उत्तरावरून यात त्याचा काही छुपा ‘अजेंडा’ होता का ?, असा फुकाचा आरोप करणारे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले.
मिटकरी या वेळी म्हणाले की, ठाण्यातील आपटे नावाच्या एका नवख्या शिल्पकाराने छत्रपतींचा पुतळा बनवला. महाराजांना जखम असलेला पुतळा बनवून आपटेला काय सांगायचे होते ? आपटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर या शिल्पात खोप का दाखवली ? या मागचा इतिहास काय आहे ? सर्व ठरवून केले आहे का ? कि याच भरवशावर कंत्राट मिळवले, याचे उत्तर द्यावे लागेल.
संपादकीय भूमिका
|