मुंबई – वांद्रे-मडगाव एक्सप्रेस गाडी १७० वर्षांनंतर चालू झाली आहे. वसई, पनवेल येथून जाणारी ही गाडी कायमस्वरूपी असणार आहे. बुधवार आणि शुक्रवारी वांद्रे येथून सुटेल, तर मडगाव येथून मंगळवार आणि गुरुवारी सुटेल. वांद्रे टर्मिनसहून ट्रेन सकाळी ६.५० मिनिटांनी सुटेल. पनवेलला ९.५५ वाजता येईल. वसई रोडला २५ मिनिटे थांबेल. ही गाडी बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमळी येथे थांबेल.
मडगाववरून वांद्रे टर्मिनससाठी ही एक्सप्रेस मडगावला ७.४० वाजता सुटेल. वांद्रे टर्मिनस ते मडगाव या प्रवासासाठी स्लीपर डब्याचे तिकीट ४२० रुपये आहे.