हेरॉईन विक्रीप्रकरणी तिघे अटकेत !
नवी मुंबई – हेरॉईन हा अमली पदार्थ विक्री प्रकरणी २ पुरुषांसह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे २० लाख रुपयांचे १०० ग्रॅम वजनाचे हेरॉईन आढळून आले.
संपादकीय भूमिका : अमली पदार्थ विक्री करणार्यांवर कठोर कारवाईच हवी !
भ्रमणभाष चोरणारे २ धर्मांध अटकेत !
कल्याण – येथील भाजीच्या बाजारात येणार्यांचे भ्रमणभाष चोरणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शहबाज शेख आणि इरफान शेख अशी त्यांची नावे आहेत. या दोघांवर याआधीही भ्रमणभाष चोरीचे गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ भ्रमणभाष आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे.
संपादकीय भूमिका : गुन्हेगारीत धर्मांधच पुढे !
हवामानाची स्थिती कळण्यासाठी रडारची संख्या वाढवणार !
मुंबई – अतीवृष्टी, विजा, गारपीट यांसारख्या तीव्र हवामानाच्या घटनांची चेतावणी काही घंटे आधीच मिळावी, यासाठी देशभरातील रडारची संख्या वाढवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक भाग किमान २ रडारच्या क्षेत्रांत येईल, पुढील ५ वर्षांत रडारचे जाळे विकसित केले जाईल, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम्. रविचंद्रन यांनी दिली.
चारचाकीच्या काचा फोडून लाखोंचा ऐवज चोरीला !
डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील रुणवाल गार्डन, पलावा या गृहसंकुलातील ३ रहिवाशांच्या चारचाकीच्या काचा अज्ञाताने फोडल्या. त्यातील कारटेप आणि सामान असा मिळून २ लाख ९५ सहस्र रुपयांचा ऐवज चोरला. त्याने लोखंडी टोकदार वस्तूने या काचा फोडल्या.
अल्पवयिनावर अत्याचार करणार्याला १२ वर्षांचा कारावास
मुंबई – ११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्या ५५ वर्षांच्या आरोपीला विशेष पॉक्सो न्यायालयाने १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. वर्ष २०१७ मध्ये ही घटना घडली होती. हा मुलगा आरोपीचा नातेवाईक होता. त्याला मज्जातंतूचा विकार आहे. अत्याचार प्रकरणी आरोपीविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.