ढोल-ताशा वादनामुळे होणार्‍या त्रासासाठी आरोग्याची काळजी घ्या !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – ढोल-ताशांच्या पथकातील वादक ढोल हा पोटाच्या खालच्या भागात बांधतात. त्यामुळे सातत्याने ढोलचे घर्षण होऊन जननेंद्रियांना इजा होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे स्नायूंना दुखापत, सूज येणे अशा तक्रारी निर्माण होतात. गणेशोत्सवानंतर पथकातील अनेक मुले-मुली आधुनिक वैद्यांकडे अशा तक्रारी घेऊन येतात. त्यामुळे ढोल-ताशा वाजवणार्‍यांनी आरोग्याला हानी पोचू नये या दृष्टीने काळजी घ्यावी, असे आरोग्यतज्ञांनी सांगितले आहे.

‘ढोल-ताशा पथक महासंघा’चे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले की, ढोल-ताशा वादनाचा सराव दीड महिना आधी केलेला असतो. विसर्जन मिरवणुकीचा एक दिवस वादन करून आजार झाल्याचे निदर्शनास आले नाही.