सनातन प्रभात > Post Type > साधना > अनुभूती > श्रीकृष्णाचे चित्र काढण्याचा प्रयत्न केल्यावर ‘गुरूंनी देवतांची सात्त्विक चित्रे उपलब्ध करून देऊन कृपा केली आहे’, याची जाणीव होणे
श्रीकृष्णाचे चित्र काढण्याचा प्रयत्न केल्यावर ‘गुरूंनी देवतांची सात्त्विक चित्रे उपलब्ध करून देऊन कृपा केली आहे’, याची जाणीव होणे
‘गोकुळाष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णाचे चित्र रेखाटण्याचा विचार माझ्या मनात आला आणि मी चित्र काढण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णाचे डोळे काढतांना ‘मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवले, तसेच त्रासही जाणवू लागला. मला चित्र पुष्कळ एकाग्रतेने काढावे लागत होते, तरी ते अपेक्षित असे येत नसल्याने मला अस्वस्थता जाणवत होती. मी शरणागतभावाने श्रीकृष्णाचे चित्र काढण्याचा प्रयत्न केल्यावर मला ते गुरुकृपेने पूर्ण करता आले. यावरून ‘देवतांची चित्रे काढणे किती कठीण असते !’, हे माझ्या लक्षात आले. ‘गुरूंनी देवतांची सात्त्विक चित्रे उपलब्ध करून देऊन आपल्यावर किती कृपा केली आहे !’, याची मला जाणीव झाली.’
– श्री. प्रसाद हळदणकर, बेळगाव (१६.८.२०२०)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक