‘८ ते १२.९.२०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर होते. १०.९.२०२३ या दिवशी आम्हाला एका संतांचा सत्संग लाभला. या सत्संगाच्या वेळी त्या संतांनी सिंधुदुर्ग येथील बालसाधक कु. चैतन्य साटम (वय ७ वर्षे, वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ५८ टक्के) याची वही हातात घेऊन त्याचा सुगंध घेतला आणि नंतर आम्हा सर्व साधकांनाही सुगंधाची अनुभूती घेण्यास सांगितले.
त्या वेळी मला त्या वहीला कापूर आणि अत्तर याचा एकत्रित सुगंध आला.’
– कु. मृणाली यादव , सांगली (१५.९.२०२३)
|