‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’तील पात्र महिलांना मिळणार लाभ !  – आदिती तटकरे, महिला आणि बाल विकास मंत्री

मुंबई – मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ मिळाला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया चालू असून त्यातील पात्र महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ सहस्र ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यांपैकी १ कोटी ४७ लाख ४२ सहस्र ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत, तर ४२ सहस्र ८२३ अर्जांची पडताळणी चालू आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’ला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बँक खात्याला आधार कार्ड ‘लिंक’ करून घ्यावे आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री तटकरे यांनी या वेळी केले.