प्रत्युत्तरात इस्रायलने हिजबुल्लाच्या १०० ठिकाणांवर केले आक्रमण
तेल अविव (इस्रायल) – हिजबुल्ला(Hezbollah) या जिहादी आतंकवादी संघटनेने इस्रायलचा(Israel) शेजारी देश लेबनॉनमधून(Lebanon) इस्रायलच्या ११ सैन्य तळांवर ३२० रॉकेट आणि ड्रोन यांद्वारे आक्रमण केले. ३० जुलै या दिवशी इस्रायलने केलेल्या आक्रमणात हिजबुल्लाचा प्रमुख कमांडर फुआद शुक्र (Fuad Shukr) ठार झाला होता. त्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी हिजबुल्लाने हे आक्रमणे केले; मात्र या आक्रमणानंतर इस्रायलने तातडीने प्रत्युत्तर देत लेबनॉनमधील हिजबुल्लाने जेथून रॉकेट डागले होते, त्या ठिकाणी आणि अन्य असे १०० हून अधिक ठिकाणांवर आक्रमण केले. दुसरीकडे अमेरिकेने(America) म्हटले की, अमेरिका इस्रायलला सुरक्षित ठेवण्यासाठी साहाय्य करत राहील.
जो कुणी आमची हानी करेल, आम्ही त्याची हानी करू ! – पंतप्रधान नेतान्याहू
हिजबुल्लाच्या आक्रमणानंतर इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलांट (Yoav Gallant) यांनी ४८ घंट्यांसाठी आणीबाणी घोषित केली. हिजबुल्लाच्या आक्रमणानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी मंत्रीमंडळाची बैठक बोलावली. ते म्हणाले की, आमच्यावर रॉकेटद्वारे आक्रमण करण्यात आले असून ते हाणून पाडण्यात आले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही काहीही करण्यास सिद्ध आहोत. जो कुणी आमची हानी करेल, आम्ही त्याची हानी करू.
इस्रायली सैनिकांनी गाझा मशिदीत कुराण जाळल्याचा हमासचा आरोप
हमासने इस्रायली सैनिकांवर गाझा (Gaza) येथील मशिदीत कुराण जाळल्याचा आरोप केला आहे. हमासने (Hamas) अरब आणि इस्लामी देशांना इस्रायली सैनिकांच्या या कृतीचा निषेध करण्याचे आवाहन केले. या आरोपावर इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकातत्परतेने जशास तसे प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे भारताने इस्रायलकडून शिकावे ! |