राज्यभरातून विरोध
मैसुरू (कर्नाटक) – महिन्यापूर्वीच निलंबित झालेला हवालदार सलीम पाशा याला स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदक देण्यात येणार आहे. यावरून आता वाद निर्माण झाला असून पदक देण्यास राज्यातील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. उत्कृष्ट कर्तव्य बजावणारे राज्यातील १२६ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना वर्ष २०२३ चे मुख्यमंत्री पदक देण्यात येणार आहे. यात पाशा याचे नाव आहे.
सलीम पाशा याचे गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. लोकांची मालमत्ता चोरण्यासाठी अप्रत्यक्षपणे साहाय्य केल्याच्या आरोपावरून सलीम पाशा निलंबित आहे.
संपादकीय भूमिकामुसलमानप्रेमी काँग्रेस सरकार अशांनाच डोक्यावर घेणार ! |