संचालक मंडळासह कर्जदारांवर गुन्हे नोंद होणार !
भोर (जिल्हा पुणे) – तालुक्यातील प्रख्यात ‘नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थे’च्या संचालक मंडळाने काही संचालकांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांना अनियमित कर्जवाटप केले. त्यात अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे लेखापालच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आर्थिक अपव्यवहाराचा अंतिम लेखापालांचा अहवाल आल्यानंतर संचालक मंडळावर आणि थकीत कर्जदारांवर फौजदारी अन् दिवाणी स्वरूपाचे दावे प्रविष्ट करण्यात येणार आहेत.
‘नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थे’ने कर्ज वसुली न केल्यामुळे ठेवीदारांना ठेवी परत करता आल्या नाहीत; म्हणून सहकार खात्याने २ ऑक्टोबर २०२३ पासून प्रशासकाची नेमणूक केली आहे. प्रशासक आल्यानंतर ३ सहस्र थकीत कर्जदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ५२० जणांना १०१ कलमांतर्गत नोटीस, १४ जणांच्या स्थावर मालमत्तांना नोटीस, तर २५० कर्जदार आणि जामीनदारांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचा आदेश देण्यात आला आहे. काही कर्जदारांनी १ कोटी ६० लाख रुपयांचे धनादेश दिले. ते अधिकोषामध्ये वटले नसल्याने त्यांनी पतसंस्थेची फसवणूक केली; म्हणून १३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकापतसंस्थांमधील आर्थिक अपहार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्यासह त्यांची कार्यवाही करावी ! |