थोडक्यात : वाशी येथून अमली पदार्थ विकणार्‍या २ धर्मांधांना अटक !, डोंबिवली येथे अमली पदार्थ विकणारी टोळी अटकेत !…..

वाशी येथून अमली पदार्थ विकणार्‍या २ धर्मांधांना अटक !

नवी मुंबई – वाशी येथून अमली पदार्थ विकणारे सलाम इस्लाम खान आणि मोहसीन अस्लम खान या दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख २० सहस्र रुपयांचा ‘एम्.डी.’ (मॅफेड्रॉन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : अमली पदार्थ विकून नागरिकांना व्यसनाधीन बनवणार्‍यांवर कठोर कारवाई हवी !


डोंबिवली येथे अमली पदार्थ विकणारी टोळी अटकेत !

ठाणे – डोंबिवली येथे ‘एम्.डी.’  (मॅफेड्रॉन) हा अमली पदार्थ विक्री करणार्‍या प्रवीण चौधरी याला त्याच्या साथीदारांसह ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्याच्याकडून २१ लाख ३० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.


भरधाव टेंपोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मद्यप्राशन केल्याने चालकाचे नियंत्रण सुटले

वसई – रुग्णालयात असलेल्या आईला भेटून घरी परतणार्‍या मेलबा मायकल बेन्स (वय ४० वर्षे) महिलेचा समोरून येणार्‍या भरधाव टेंपोने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. (असे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी पोलीस काय उपाययोजना काढणार ? – संपादक) नायगाव पश्चिमेच्या उमेळा फाटा येथे ९ ऑगस्टला सकाळी ही घटना घडली. टेंपोचालक मद्याच्या नशेत असल्याने त्याचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.


म्हाडाचे घर देण्याचे आमीष दाखवणारा धर्मांध अटकेत !

मुंबई – ५ वर्षांपूर्वी अंधेरी येथे मेराज आणि महंमद यांची अनिलसमवेत ओळख झाली होती. ओळखीनंतर या दोघांनी त्यांच्या इमारतीमध्ये म्हाडाचा एक ‘फ्लॅट’ विक्रीसाठी उपलब्ध असून तो स्वस्तात देण्याचे आमीष अनिल यांना दाखवले. या दोघांवर विश्वास ठेवून त्यांनी मेराजला ७ लाख ५० सहस्र रुपये तर महंमद अनिसला ७ लाख रुपये दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी ‘फ्लॅट’चा ताबा न देता फसवणूक केली. (धर्मांधांवर विश्वास ठेवल्यावर पश्चात्तापाला सामोरे जावे लागते, हे स्पष्ट करणारी घटना ! – संपादक) अनिल यांच्या तक्रारीनंतर पसार झालेल्या दोन्ही आरोपींपैकी मेराज खान याला पोलिसांनी अटक केली आहे.

संपादकीय भूमिका : गुन्हेगारीच्या सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असणारे धर्मांध !


मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचे ३ लाखांहून अधिक अर्ज संमत

मुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेत ३ लाख ८४ सहस्र ८४३ अर्ज प्राप्त झाले असून ३ लाख १० सहस्र १८६ अर्ज संमत झाले आहेत. फेरतपासणीसाठी ७१ सहस्र ४५९ अर्ज पाठवण्यात आले आहेत, तर १ सहस्र १५० अर्ज संमत करण्यात आलेले नाहीत.

राज्य शासनाने राज्यातील महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्यायाच्या विविध योजना चालू केल्या असून या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगर जिल्ह्यात या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी करण्यात येत आहे.