इमारतीतून कुत्रा अंगावर पडल्याने ३ वर्षांच्या मुलीचा उपचाराच्या वेळी मृत्यू !
ठाणे – मुंब्रा येथे ‘चिराग मॅन्शन’ या ५ मजली इमारतीच्या गच्चीतून रस्त्यावरून जाणार्या ३ वर्षांच्या मुलीवर कुत्रा पडला. त्यामुळे उपचाराच्या वेळी या मुलीचा मृत्यू झाला. मुलगी तिच्या आईसमवेत रस्त्याने चालली होती, तेव्हा अचानक ही घटना घडली. या घटनेत कुत्राही घायाळ झाला आहे. जैद सय्यद नावाच्या व्यक्तीचा हा कुत्रा आहे. (कुत्रा पडला कि टाकला असेही कुणाला वाटले, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
बीड जिल्ह्यात अद्याप मोठा पाऊस न झाल्याने पाणीसाठा अल्प !
बीड – अर्धा पावसाळा संपला, तरी बीड जिल्ह्यात मोठा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील नद्यानाल्यांत पाणी साचलेले नाही, त्यामुळे सिंचन प्रकल्प तळाशीच राहिले आहेत. जिल्ह्यात सध्या केवळ १६.०५ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असणारा १६ टक्के पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे.
जिल्ह्यातील १९ प्रकल्प अजूनही कोरडे आहेत, तर ६७ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे. सुमारे २४ प्रकल्पांत २५ टक्क्यांहून अल्प पाणी शिल्लक आहे. १५ प्रकल्पांत ५० टक्क्यांपर्यंत पाणी आहे. तर ७ तलावांत ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २८ प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत.