मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांचा सहभाग
पुणे – येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. माया पवार यांनी एका २० वर्षीय रुग्णाला ‘गर्भपाता’च्या गोळ्या दिल्याचे उघड झाले आहे. तसेच त्यांनी गर्भपात कायद्याचे (एम्.पी.टी.) उल्लंघन केल्याचे २ ऑगस्ट या दिवशी समोर आले. पुणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी ३ ऑगस्ट या दिवशी डॉ. पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश मनोरुग्णालयाला दिले आहेत. एका २० वर्षीय तरुणीची प्रकृती गर्भपाताच्या वेळी गंभीर झाली होती. याची अधिक चौकशी केली असता, डॉ. माया पवार यांनी ‘आशासेविकां’च्या साहाय्याने संबंधित रुग्णास गर्भपातासाठीच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यामुळे या गर्भवतीची प्रकृती गंभीर झाली. ही महिला ४ महिन्यांची गर्भवती होती. कायदेशीर गर्भपातासाठी १२ सप्ताहांच्या म्हणजेच ३ महिना गर्भधारणेची समयमर्यादा आहे; मात्र हा कालावधी संपल्यानंतर गर्भपात करण्यात आला आहे. (वैद्यकीय व्यवसायात अशा प्रकारे नियमबाह्य कृती करणार्या आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई करून त्यांची मान्यता रहित करणे आवश्यक आहे. – संपादक)