‘एकदा मी प्रचारसेवेला गेले असता एका जिज्ञासूंनी मला सांगितले, ‘‘आता श्री गणेशचतुर्थी, दसरा आणि दिवाळी हे सण असल्याने मला सनातनची सात्त्विक उत्पादने अधिक प्रमाणात हवी आहेत. मला ती उत्पादने माझ्या नातेवाइकांना भेट द्यायची आहेत.’’ माझ्या मनात ‘ते जिज्ञासू त्यांच्या नातेवाइकांना सनातनची सात्त्विक उत्पादने भेट देणार, तर ती देणार्या आणि घेणार्या व्यक्तींना त्यातील चैतन्याचा लाभ व्हायला हवा. या प्रचार साहित्याची (सात्त्विक उत्पादनांची) बांधणी कशी करायला हवी ?’, असे विचार येऊ आले.
१. ‘प्रचार साहित्याची बांधणी सात्त्विक व्हावी’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि पू. रमेश गडकरी यांच्याशी बोलणे
मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) सतत प्रार्थना करत होते, ‘सनातनची सात्त्विक उत्पादने समाजातील व्यक्तीपर्यंत जाण्यासाठी काय प्रयत्न करू ? मी कसे करू की, ती लोकांपर्यंत गेल्यावर त्यांना ती उत्पादने आवडतील. त्यांना त्याचा लाभ होईल.’ याविषयी मी माझे यजमान पू. रमेश गडकरी (सनातनचे १९ वे संत, वय ६७ वर्षे) यांच्याशीही बोलले. माझ्या मनात ‘सात्त्विक उत्पादनांमध्ये पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आहे. या उत्पादनांचा संच बनवतांना त्यात सनातनचा ग्रंथ किंवा लघुग्रंथ देऊ शकतो’, असा विचार येत होता.
२. विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना जिज्ञासूंना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या संचाविषयी विचारणे
२ अ. गणेशचतुर्थीच्या काळात जिज्ञासूंनी सात्त्विक उत्पादनांच्या १० संचांची मागणी करणे : मी विज्ञापने मिळवण्याच्या सेवेसाठी गेल्यावर जिज्ञासूंना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या संचाविषयी विचारू लागले. मी त्यांना सांगितले, ‘‘श्री गणेशचतुर्थीनिमित्त नातेवाइकांना सात्त्विक उत्पादने भेट देऊ शकता.’’ तेव्हा काही जणांनी माझ्याकडे १० संचांची मागणी केली.
३. सात्त्विक उत्पादनांचे सादरीकरण चांगले होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे कृती करणे अन् उत्पादनांच्या संचांची वाढीव मागणी मिळणे
३ अ. मी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, विज्ञापनदात्यांना १० संच द्यायचे आहेत. उत्पादनांचे सादरीकरण (‘प्रेझेंटेशन’) चांगले व्हायला हवे. त्यासाठी मी काय करू ?’ तेव्हा गुरुदेवांनी वेगवेगळे उपाय सुचवले आणि तसे करण्यासाठी माझे प्रयत्न चालू झाले.
३ आ. मला वाटले, ‘उत्पादने खोक्यात ठेवली, तर ती बाहेरून दिसणार नाहीत.’ तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने मला सुचले, ‘प्लास्टिक’च्या पारदर्शक पिशवीमध्ये साहित्य भरून देऊ शकतो; मात्र हे साहित्य पारदर्शक पिशवीमध्ये असेच भरून दिले, तर ते चांगले वाटणार नाही आणि खोक्यात भरून दिले, तर ‘खोक्यात काय आहे ?’, हे खोका उघडल्याविना कुणाच्या लक्षात येणार नाही आणि ते चांगलेही वाटत नाही. ही उत्पादने एका पुठ्ठयावर चिकटवली, तर चांगले होईल.’
३ इ. नंतर मला सुचले, ‘त्या पिशवीच्या मापाप्रमाणे एक पुठ्ठा घेऊन त्या पुठ्ठयावर उत्पादने चिटकवली, तर चांगले दिसेल.’ मी सनातनचा सात्त्विक कापूर भरून येणार्या रिकाम्या खोक्यांच्या वरचा आणि तळाचा पुठ्ठा घेतला.
३ ई. मी पुठ्ठ्याची नितळ आणि स्वच्छ बाजू मागच्या बाजूला ठेवली आणि पुढच्या बाजूला सर्व सात्त्विक उत्पादने लावून ठेवली. मी पुठ्ठ्याच्या पाठीमागच्या बाजूला ‘गणेश पूजाविधी अॅप’चे हस्तपत्रक (‘पॅम्प्लेट’) चिकटवले आणि पुढच्या बाजूला सर्व पूजा साहित्य चिकटवले. मी त्यात एक गणपतीविषयीचा ग्रंथ ठेवला.
३ उ. साहित्याची रचना अधिक चैतन्यदायी होण्यासाठी पू. गडकरीकाकांना विचारणे : मी उत्पादने ठेवलेला संच पू. गडकरीकाकांना दाखवला. नंतर मी तो संच संबंधित जिज्ञासूला दाखवला. तेव्हा त्याला संच पुष्कळ आवडला. त्याने संचांची अधिक मागणी केली.
४. ‘देवाला अपेक्षित असे केल्यावर आणि देवाने दिलेल्या विचारानुसार केल्याने देव साहाय्य करतो’, असे अनुभवायला येणे
मी ते संच आणखी ४ व्यक्तींना दाखवले. समाजातील एका व्यक्तीने श्री गणेशचतुर्थीसाठी कापूर आणि अष्टगंध यांच्या प्रत्येकी एका लहान डबीची मागणी केली होती. मी त्यांना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचा संच दाखवला. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मलाही असे ५ संच द्या.’’ ज्या जिज्ञासूंनी १० संच मागितले होते, त्यांनी वाढीव संचांची मागणी केली. तेव्हा ‘देवाला अपेक्षित असे केल्यावर आणि देवाने विचार दिल्याप्रमाणे केल्याने देवही साहाय्य करतो’, हे मला अनुभवायला आले.
५. दसरा आणि दिवाळी यांच्या कालावधीत सोन्या-चांदीच्या दुकानांच्या मालकांनी ५० संचांची मागणी करणे
दसरा आणि दिवाळी या कालावधीत लोक सराफी (सोन्या-चांदीच्या) दुकानांमध्ये सोने खरेदी करण्यासाठी येतात. मी उटणे, उदबत्ती, साबण ही सात्त्विक उत्पादने अन् सनातनच्या सात्त्विक अलंकारांविषयीचे ग्रंथ यांचा एक नवीन संच सिद्ध केला. मी हा संच सोन्या-चांदीच्या दुकान मालकांना दाखवला. मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही त्या संचात तुमचे कार्ड किंवा तुमचे अन्य काही साहित्य असेल, तर ते ठेवू शकता.’’ तेव्हा त्या सराफी दुकानदारांना तो संच पुष्कळ आवडला. ते म्हणाले, ‘‘सनातनचे उटणे आहे, म्हणजे ते चांगलेच असणार !’’ त्यांनी माझ्याकडे ५० संचांची मागणी केली.
६. सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचा संच जिज्ञासूंना बनवून दिल्यावर संच देणार्या आणि घेणार्या व्यक्तींच्या चेहर्यावरचा आनंद देवाने दाखवणे
समाजातील व्यक्तींना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे संच बनवून दिल्यावर ते संच देणार्या आणि घेणार्या व्यक्तींच्या चेहर्यावरचा आनंद देवाने मला दाखवला. ‘समाजातील व्यक्तींकडून या संचांना पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांना असे संच भेट देणे आवडत आहे’, हे देवाने माझ्या लक्षात आणून दिले. सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे सादरीकरण (‘प्रेझेंटेशन’) कसे करायला हवे’, हे मला शिकायला मिळाले.
देवाच्या कृपेने मला हे शिकता आले. त्याबद्दल ईश्वरचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. नीला रमेश गडकरी (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |