‘मुसळधार पाऊस आणि धुके यांमुळे हिंसाचार करणार्यांविरुद्ध कारवाई करणे अडचणीचे झाले. गड परिसरातील कोणत्याही निवासी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ न्यायालयीन संरक्षण नसलेल्या व्यावसायिक आस्थापनांवरच कारवाई करण्यात आली, असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आणि अधिवक्ता प्रियभूषण काकडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाची तोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, पुणे येथील ‘हिंदु बांधव समिती’चे रवींद्र पडवळ यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’ (३१.७.२०२४)