‘एक दिवस मला अकस्मात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन लाभले. त्यांच्या दर्शनामुळे माझी झालेली अवस्था शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
‘ध्यानीमनी नसतांना अकस्मात् सगुण सच्चिदानंद परब्रह्म मूर्ती समोर येऊन ठाकली. क्षणभर विसर पडला मला या जगताचा. ‘काय होत आहे ?’, हे कळतच नव्हते. दृष्टीमात्रे त्यांनी अनुताप घालवला. मम देहाला कंप सुटला. मुखातून शब्दही फुटत नव्हते. काय बोललो मी त्यांच्याशी ‘खरे कि खोटे ?’ त्यांच्या प्रेममय दृष्टीने मी ओलाचिंब झालो, की त्या पर्जन्यधारा तरी कशा देहाला न्हाऊ घालतील ? काही क्षणच ते; परंतु मी अजूनही त्याच क्षणांत रमलो आहे. वास्तवाचे मला भानच नाही. ती सगुण मूर्ती, ते सगुण चैतन्य, सगुण परब्रह्म सारखे दृष्टीपुढे उभे ठाकते. सर्व व्याप सोडून त्यांच्या स्मरणातच रहावेसे वाटते. काव्याचे वरदान त्यांनी दिले; पण हे क्षण शब्दबद्ध करण्यास मी तोकडा आहे. ‘सर्वधर्म त्यजूनी जावे शरण त्यांच्या चरणी ।’ हेच जीवनाचे सार !’
राम मिले मोहे राम मिले ।
निजधाम के सब सुख मिले ॥ १ ॥
भाग खुले मेरे भाग खुले ।
दर्शन उनके आज मिले ॥ २ ॥
दर्शन उनके आज हुए ।
प्राण मेरे भवपार हुए ॥ ३ ॥
पलभर की दृष्टि उनकी ।
सारे दुखों को बिसराती ॥ ४ ॥
कैसा शब्दों में बांधू ।
कैसे उनका रूप बूझूं ॥ ५ ॥
चरणों में उनके रहना ।
जीवन का उद्देश है इतना ॥ ६ ॥
आप ही जगदीश हमारे ।
जीवन केवल आपके सहारे ॥ ७ ॥
स्मृति उस क्षण की नित होवे ।
रूप आपका स्वरूप में पावे ॥ ८ ॥
प्रार्थना आपके चरणों में यही ।
न छूटे सुमिरन की बाट कहीं ॥ ९ ॥
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |