हा कुठला न्याय ?

पुण्यातील सुप्रसिद्ध सारसबागेत काही दिवसांपूर्वी काही मुसलमानांनी नमाजपठण केले. यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशी हिंदूंनी एकत्रित येऊन श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरामध्ये महाआरती केली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी मुसलमानांना प्रथम नोटीस देण्याऐवजी गर्दी जमवून आरती केल्याकारणाने एका हिंदु तरुणाला नोटीस दिली. यामुळे प्रश्न पडला की, स्वतंत्र भारतात हिंदू खरेच स्वतंत्र आहेत का ? आपल्याला आपल्या धर्माचे आचरण, तसेच सण, उत्सव आनंदाने आणि मोकळ्या वातावरणात साजरे करता येतात का ? कि आपण खरेच अजूनही पारतंत्र्यात आहोत ? राज्यघटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा लाभ घेतांना हिंदूंवर नेहमीच दबाव का आणला जातो ? मुसलमानांनी कुठेही नमाजपठण करणे, ही चूक नाही, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदूंनी आराध्यदेवतेची आरती करणे, हा एवढा मोठा प्रमाद आहे की, त्यावरून गुन्हा नोंदवला जातो, अशी हिंदूबहुल भारतात हिंदूंची स्थिती आहे. हा कुठला न्याय आहे ? आणि कुठले स्वातंत्र्य आहे ?

गोमाता, भारतमाता, महिला, वेद यांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला सिद्ध असणे, हे हिंदवी स्वराज्याचे व्रत आहे. ‘‘आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले, ते दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे’’, असे पू. संभाजीराव भिडेगुरुजी का म्हणाले ?, ते वरील उदाहरणावरून चांगलेच लक्षात येते. लोकमान्य टिळकांनी ‘सार्वजनिक गणेशोत्सव’, ‘सार्वजनिक शिवजयंती’ यांसारखे उपक्रम राबवले. त्या काळात अनेकांनी त्यांच्या परीने हिंदूंना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंच्या मनात हिंदुत्वाची ज्योत पेटवण्याचे कार्य केले. तेव्हाही त्यांच्यासारख्या हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या मंडळींना इंग्रजांनी त्रास दिला, छळ केला. अनेक वर्षे कारागृहात ठेवले. हिंदु धर्मातील सण, उत्सव हे सार्वजनिकही आहेत. प्रत्येक धार्मिक कृतीतून व्यक्तीची साधना होते, तर सार्वजनिक उत्सवातून समाज एकत्र येतो. संस्कृती टिकून रहाते.

हिंदु धर्माची परंपरा जोपासायची, तर समाजाला एकत्र आणणे, एकत्रित येऊन कृती करणे हे आलेच; परंतु आज हीच कृती पोलीस गुन्हेगारी वृत्तीची ठरवत आहेत. आरती म्हटल्याने कायदा किंवा शांतता भंग कशी होते ? रस्त्यावर वा सार्वजनिक ठिकाणी राजरोस नमाजपठण केले जाते, तेव्हा कायदा भंग होत नाही का ? मोठ्या आवाजात ५ वेळा अजान दिली जाते, तेव्हा शांतता भंग होत नाही; मात्र हिंदूंनी एकत्र येऊन काहीही धार्मिक कृती केली की, पोलीस प्रशासन त्यावर लगेच आक्षेप घेते आणि विशेषतः ती कृती धर्मांधांच्या आघातांवरील प्रत्युत्तर म्हणून असेल, तर पहायलाच नको. खरेतर पोलिसांनी धर्मांधांवर गुन्हा न नोंदवल्याप्रकरणी त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, ही राष्ट्र अन् धर्म प्रेमींची अपेक्षा !

– श्री. अमोल चोथे, पुणे