‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी सांगली येथील सौ. स्मिता माईणकर यांना आलेल्या अनुभूती

‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. स्मिता माईणकर

१. नामजप एकाग्रतेने होऊन आनंद मिळणे 

मी रामनाथी आश्रमात प्रवेश केल्यापासूनच माझा नामजप चांगला होऊ लागला. मी ध्यानमंदिरात १५ मिनिटे बसून नामजप केला. त्या वेळी माझे मन एकाग्र झाले आणि मला आनंद मिळाला. निवासाच्या ठिकाणीही माझे मन एकाग्र होऊन माझा नामजप चांगला झाला. शिबिराच्या काळातही अधून मधून माझा नामजप चांगला होत होता. बर्‍याच दिवसांनी मला नामजप करतांना आनंद मिळाला.

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ वायुतत्त्वाचे प्रयोग घेत असतांना साधिकेच्या हाताच्या बोटांचा त्रास उणावणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी वायुतत्त्वाचे प्रयोग घेतले. तेव्हा साधकांनी उजवा हात वर करून डोळे बंद केले. ‘तेव्हा माझ्या हाताच्या मधल्या बोटातून हातात काहीतरी गेले आणि हात हालला’, असे मला जाणवले. काही वेळाने मला ‘तो हात मधल्या बोटापासून वरपर्यंत गरम झाला’, असे वाटले. त्या हातात जराशा कळा येऊन हात थोडा दुखू लागला. याविषयी सद्गुरु गाडगीळकाका यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘त्या हातात काहीतरी नकारात्मक शक्ती किंवा त्रास असेल; म्हणून तो दुखतो.’’ अर्ध्या-पाऊण घंट्याने माझा हात दुखायचा थांबला. नंतर माझ्या असे लक्षात आले, ‘काही मासांपासून त्या हाताचे मधले बोट दुमडतांना मला त्रास होत होता; परंतु आता तो त्रास ९५ टक्के उणावला आहे. आता ते बोट दुमडतांना पूर्वीसारखा त्रास होत नाही.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. स्मिता माईणकर (वय ५८ वर्षे), सांगली (२१.१.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक