‘हिंदुस्थानातील संपूर्ण हिंदु समाज सारा केव्हा तरी पूर्ण संघटित होईल नि मग हिंदु राष्ट्र स्वतंत्र होईल’, ही खुळी कल्पना आहे. तसे कधीच घडणार नाही; परंतु राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी राष्ट्राची काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सर्वसामान्य सिद्धता व्हावी लागते आणि ही सिद्धता काही २-४ दिवसांत नि केवळ भावनेच्या जोरावर होऊ शकत नाही. ‘कोणतेही काम घडवावयाचे, तर त्यासाठी शक्तीची आवश्यकता असते’, हा पदार्थ विज्ञानशास्त्राचा साधा नियम राष्ट्रप्रपंचामध्ये तर अवश्य लागू पडतो. ही शक्तीच नसेल, तर कुणी असला, तरी काम कसे पार पाडणार ? तत्त्वज्ञान मोठे उदात्त नि तेजस्वी असले, तरी त्याला व्यवहारात उतरवण्यासाठी काही तरी शक्तीचे पाठबळ असल्याविना चालत नाही आणि आजच्या काळात तर विशेषत: संघटित असणे, हीच फार मोठी शक्ती आहे.
(साभार : ‘अज्ञातांची वचने’ या पुस्तकातून, प्रकाशन संस्थेचे संचालक : श्री. अमरेंद्र गाडगीळ)