गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे महंमद आलम याने त्याची ‘लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहाणारी प्रेयसी पूजा हिची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला.
१. महंमद आलम आधीच विवाहित होता. त्याला ४ मुले आहेत. तो पूजा समवेत ४ वर्षे रहात होता. पोलिसांनी महंमद आलम याला अटक केली आहे.
२. पूजा हिचाही विवाह झाला होता; मात्र ती पतीपासून विभक्त झाली होती. तिला ३ मुले होती.
३. पूजा हिची हत्या केल्यानंतर आलम याने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन ‘पूजा बेपत्ता झाली आहे’, अशी तक्रार प्रविष्ट केली होती.
४. आलम याने पूजा हिच्याशी ६ महिन्यांपूर्वी विवाह केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. त्यानंतर पूजा आलम याला त्याच्या पत्नीपासून वेगळे होऊन तिच्यासमवेत रहाण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे आलम याने पूजा हिची हत्या केली.
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद’विरोधी कायदा असूनही अशा घटना थांबत नाहीत; कारण धर्मांध कायद्याला घाबरत नाहीत ! |