खासदार धनंजय महाडिक यांचे गृहमंत्र्यांना निवेदन !
कोल्हापूर – विशाळगड आंदोलनाच्या प्रकरणी शिवभक्तांवर नोंद झालेले गुन्हे तातडीने मागे घ्या, या मागणीचे निवेदन भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावर गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘घटनेची संपूर्ण माहिती घेऊन कुणावरही अन्याय होऊ देणार नाही’, असे आश्वासन दिले.